माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:46 IST2019-04-19T14:43:21+5:302019-04-19T14:46:14+5:30
माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगबर आगवणे यांनी बॉलीग केल्याने

माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी
सुर्यकांत निंबाळकर
आदर्की- माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगबर आगवणे यांनी बॉलीग केल्याने प्रचाराचा सिनवटा घालवला . माढा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने या मतदार संघात उमेदवारीवरुन चढाओढ निर्माण झाली होती गत तीन महिन्यापासून प्रभाकर देशमुख , संजीवराजे निंबाळकर , विजय सिंह मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असताच रणजीत सिंह मोहिते - पाटील भा . ज . भ .मध्ये प्रवेश केला त्याच्या पाठोपाठ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही भा .ज. प .मध्ये प्रवेश केला
अखेरच्या क्षणि भाजपची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली. तर राष्ट्रवादीची
उमेदवारी संजय शिंदे यांना मिळाली .
दोघेही साखर कारखान्याचे मालक पण लोकसभेला दोघेही नवखे त्यामुळे दोघे हे प्रचाराम्यान थकलेले कारण मतदार संघ मोठा , बहुंताशी दुष्काळी , उन्हाची त्रीवता मोठया प्रमाणात आहे शुक्रवार दि .१९ रोजी दुपारच्या बारा ते एकच्या दरम्यान आदर्की हुन आळजापुर येथे प्रचाराला जात असताना कापशी फाट्यावर क्रिकेटचे सामाने सुरू असल्याचे पाहुन रणजित दादा यांनी गाडी थांबवुन मैदानात जावुन बॅट हातात धरली तर दिगबर आगवणे यांनी बॅटीग केली. सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी केली तर हुकले यावेळी दिग बर अगवणे , शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख अमोल आवळे , भा .ज.प , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष खुशाल वाघ , अमोल बोडके , मनोज कला पट , प्रविण बोडके , विशाल नलवडे , अमित रणवरे , आदी खेळाडू उपस्थित होते.