शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिवरूपराजे यांच्याशी राजकीय संबंध संपले, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:53 IST

एकवेळ रणजितसिंह यांच्याशी तडजोड करू; त्यांच्याशी नाही

फलटण : ‘महाराष्ट्रासह फलटणच्या राजकारणात आमचा विरोध हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांना नव्हता. आमचा विरोध हा माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना होता. मी स्वतः देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बैठकीत सांगितले होते. प्रशासनाला वेठीस धरून आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणे, अशा प्रकारची टोळीच जिल्ह्यात तयार झाली होती. त्याच्यातले हे एक होते. म्हणून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. एकवेळ माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी तडजोड करेन; कारण ते घर इथले आहे; परंतु शिवरूपराजे खर्डेकर यांच्याबरोबर तडजोड करणार नाही,’ असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आसू (ता. फलटण) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, राजन फराटे, अशोक तावरे यांच्यासह आसू पंचक्रोशीतील राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आसू गावातील शाळेच्या मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविणे, बाजार समितीचा उपबाजार व जनावरे बाजार भरविणे, बौद्ध वस्तीमध्ये बौद्धविहार बांधणे अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.रामराजे म्हणाले, ‘मी जर लोकसभेला माजी खासदारांबरोबर राहिलो असतो तर लोकसभा निवडणुकीनंतर सभापतिपद मला मिळाले असते; परंतु मी नाकारले. सभापतिपद घेऊन काय करू. माझा कार्यकर्ता माझ्याजवळ राहिला नसता. शिवरूपराजे यांना फलटण तालुक्यातील पदे देताना काय अजित पवार यांना विचारून दिली होती काय? आम्ही तुमच्या घराकडे बघून पदे दिली होती. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आणि फलटणमध्ये आम्हाला तिकीट मिळणार आहे, असे म्हणून माजी खासदार फलटणमध्ये फिरत आहेत. अजित पवार यांना आम्ही विचारू, नाहीतर आमची भूमिका सांगू, नाहीतर आम्हाला काय करायचे ते करू.आमची राजकीय सुरूवात या तालुक्याचे भले करण्यासाठी होती. फलटण तालुक्यातील अडचणीत असलेल्या कुठल्या संस्थेबाबत शिवरूपराजे पुढे आले होते. संजीवराजे खरंतर आपण आसू भागातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. कारण जो माणूस आपण त्यांच्यावर लादला त्याच माणसाने त्यांची घरेदारे बघितली नाहीत.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर