शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

राजे.. गनीम ओळखा!

By सचिन जवळकोटे | Updated: February 26, 2018 09:06 IST

बारामतीचा ‘जाणता राजा’ सातारी राजधानीत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाºया सोहळ्यावर त्यांचेच मनसबदार-राजसरदार बहिष्कार टाकतात. तरीही ते ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ छान !’ म्हणत मान हलवून निघून जातात. ही रंजक गोष्ट इटुकल्या-पिटुकल्या लेकरालाही खरी वाटेनाशी झालीय... म्हणूनच की काय, ‘तुम्ही मारल्यासारखं करा, मी कुरवाळल्यासारखं करतो !’ अशा कटाची ‘डबल गेम’ टीप आपल्या सहकाºयांना ...

बारामतीचा ‘जाणता राजा’ सातारी राजधानीत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाºया सोहळ्यावर त्यांचेच मनसबदार-राजसरदार बहिष्कार टाकतात. तरीही ते ‘व्वाऽऽ व्वाऽऽ’ छान !’ म्हणत मान हलवून निघून जातात. ही रंजक गोष्ट इटुकल्या-पिटुकल्या लेकरालाही खरी वाटेनाशी झालीय... म्हणूनच की काय, ‘तुम्ही मारल्यासारखं करा, मी कुरवाळल्यासारखं करतो !’ अशा कटाची ‘डबल गेम’ टीप आपल्या सहकाºयांना देऊन थोरले बारामतीकर परतल्याची आवई उठलीय... पण साताºयाचे थोरले राजे ‘मी रडल्यासारखं करतो,’ म्हणणाºया कॅटेगिरीतले नसल्यानं बहिष्कारामागच्या ‘मास्टर मार्इंड’चा शोध ते घेणारच, याची सर्वांनाच खात्री पटलीय. मात्र ‘गनीम कोण?’ याचा शोध लागल्यानंतर मात्र तातडीनं राजेंना ‘घड्याळ की कमळ’ याचा फायनल डिसीजन घ्यावाच लागणार.‘बालेकिल्ला’शब्दातीलदोन अक्षरं गायब होऊ शकतात !साताºयाचे ‘थोरले राजे’ अन् बारामतीचा ‘जाणता राजा’ यांच्यात भलेही कसला गुप्त तह झाला असला तरीही त्यांचं सैन्यच त्यांच्या पाठीशी नसेल तर युद्ध कसं करणार? सातारी राजेंची बदलती पॉझिटिव्ह भूमिका भलेही बारामतीकरांना आश्वासक वाटत असली तरी इतर सरदारांची आक्रमकता पक्षालाच घातक ठरणार, त्याचं काय? खरंतर, ‘घड्याळ’ न घेता युद्धात उरतलं तर काय होऊ शकतं, याचा दाहक अनुभव राजेंनी गेल्या झेडपी अन् पंचायत समितीला घेतलाय. केवळ एका पालिकेच्या जीवावर आठ तालुक्यांचा भलामोठा मतदारसंघ जिंकता येत नाही, हे न समजण्याइतपत राजे गटाचे प्रमुख भोळसर नसावेत. ‘कदाचित हातात कमळ घेऊन राजे उभारले तर त्यांना कितीतरी ठिकाणी साधा पोलिंग एजंटही मिळणार नाही,’ हा घड्याळवाल्यांचा दावा अतिरंजित वाटू शकतो. वर्षानुवर्षे सत्तेची मक्तेदारी टिकविण्याची चटक लागलेल्यांची ही भाषा इतरांना मुजोरीचीही वाटू शकते. मात्र धिस ईज फॅक्ट.. कारण जिल्ह्यात आजपावेतो खमका पर्यायच नाही.मात्र कºहाडचे अतुलबाबा, मरळीचे शंभूराज, कºहाड उत्तरचे मनोजदादा, खटावचे महेशभाऊ अन् वाईचे मदनदादा यांच्यासह एक भली मोठी टीम लोकसभेला राजेंसोबत एकत्र येऊन स्ट्रॉँग लॉबीला शह देऊ शकते. नंतरच्या विधानसभेलाही प्रत्येक प्रस्थापिताला जेरीला आणू शकते. ‘बालेकिल्ला’ शब्दातील किमान दोन अक्षरं तरी गायब करू शकते. हे सारं जाणलं असावं, म्हणूनच सर्वांचा विरोध झुगारून बारामतीकर सोहळ्याला आलेले.पन्नाशीनंतरची मॅच्युरिटी म्हणते, ‘पक्ष बदलता येत नसेल तर स्वत:ला बदला’एकाचवेळी आठ-दहा खुर्च्यांवर बसता येतं. एकाच व्यासपीठावर चार-पाच वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना बोलावताही येतं.. मात्र, एका निवडणुकीत एकच चिन्ह घेऊन उभारावं लागतं, हे आता साताºयाच्या थोरले राजेंना लक्षात आलं असावं. म्हणूनच की काय, त्यांच्या आदरणीय वडीलधाºयांच्या यादीत बारामतीकरांचंही नाव अलीकडं वरचेवर येऊ लागलंय.या सोहळ्याला ‘मातोश्री’कार आलेच नाहीत. साताºयाचे राजे एकवेळ ‘घड्याळ’ सोडून ‘कमळ’ हाती घेतील; परंतु आपलं ‘धनुष्यबाण’ उचलण्याच्या भानगडीत पडणार नाहीत, याची खात्री असल्यामुळंच की काय, त्यांनी इंटरेस्ट न दाखविलेला. देवेंद्रपंतही न येण्याच्याच मानसिकतेत होते. मात्र, दिल्लीहून नितीनरावांनी मेसेज दिला म्हणे की, ‘मासा आयता गळाला लागत असेल तर कास तलावाकाठी फिरून तरी या !’ म्हणूनच देवेंद्रपंतांनी भर व्यासपीठावर बारामतीकरांच्या साक्षीनं राजेंना मिठी मारली. त्यांना मुक्त विद्यापीठाची उपाधी देत गुलामगिरीविरोधात लढा देण्याचं आवाहनही केलं. आता या जिल्ह्यात कुणी गुलामगिरी लादलीय.. कुणाच्या इशाºयावर इथलं प्रशासन कामाला लागतंय? हे पंतांनाच ठाऊक. कदाचित कुणाला कुठं अडकावयाचं अन् कुणाला कधी खपवायचं, याचे किस्से पंतांच्या कानावर गेलेही असतील. करंट उदाहरणच द्यायचं म्हटलं तर कोरेगावात पवारांच्या जयाला ‘आत’ घालण्यासाठी कुणी कशी वरच्या पातळीवर जोरदार फिल्डिंग लावलीय, हेही त्यांना ठाऊक झालं असेल.पन्नाशीनंतर म्हणे पुरुषाला परिपक्वता येते. हाच नियम साताºयाच्या राजेंना लागू होत असेल तर त्यांची बदलती राजकीय स्ट्रॅटेजी त्याचंच चांगलं लक्षण म्हणावं लागेल; परंतु केवळ थोरल्या बारामतीकरांना जवळ करत साताºयाचं साम्राज्य अबाधित राखता येत नाही, हेही खरं. फलटणकरांसोबतचा त्यांचा वितंडवाद केवळ ‘ईगो’चाच. ‘सिंघम’ चित्रपटात अजय देवगणच्या तोंडी एक वाक्य, ‘तुम्हे हम नहीं.. तुम्हारा इगो खतम कर रहा है।’ आता प्रत्यक्षातला सिंघम कोण अन् जयकांत शिक्रे कोण, हे काळालाच माहीत. असो. ‘जगाला वाकवेन; परंतु कुणासमोर झुकणार नाही,’ ही थोरल्या राजेंची आवडती भूमिका. सातारी राजकारणात हाच मुद्दा कळीचा. कारण ‘न झुकणं’ ही जशी त्यांची खासियत, तशीच त्यांच्यात घराण्यातील इतर वंशजांचीही असणार. म्हणूनच की काय, त्यांचे बंधू बाबाराजेही आता संघर्षाला तयार झालेत. त्यांच्या आक्रमकतेमुळेच इतर आमदारही बहिष्काराच्या मोहिमेत सामील झालेत. दरम्यान, पन्नाशीनंतरची मॅच्युरिटी गाठीला बांधून थोरले राजे बदलत चाललेत. ‘पक्ष बदलता येत नसेल तर स्वत:ला तरी बदला !’ हा कानमंत्र घेऊन ते बारामतीकरांच्या अधिकाधिक जवळ चाललेत.राजे बाबाराजेंना म्हणाले, ‘तुम्ही माझे भाऊ..’हॅलोऽऽ मी राजे बोलतोय.हं बोला...कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला मी स्वत: फोन करतोय. नक्की या फंक्शनला.मी कशाला येऊ ? आम्ही चोर, दरोडेखोर अन् भ्रष्टाचारी नां.सॉरीऽऽ नां.. शेवटी तुम्ही माझे भाऊ. म्हणूनच लव्ह यू म्हणतोय. या सोहळ्याला.नको... नको... आमच्यासारख्या चोर-दरोडेखोरांमुळं तुमचा कार्यक्रम विनाकारण खराब व्हायला नको.असं का करताय ? एकवेळ सीएम अन् मोठे साहेब नाही आले तरी चालतील... पण मला तुमच्या हस्तेच कार्यक्रम करायचाय. आता मी किती राहिलो पंधरा-वीस वर्षांचा..मला काय माहीत.. तुम्ही अजून किती वर्षांचे?नाही... नाही.. तसं नाही... मी पंधरा वर्षे; पण तुम्ही नक्की कमीत कमी आणखी तीस-चाळीस वर्षांचे. मग या नक्की.जमणार नाही. उदंड आयुष्याच्या शुभेच्छा सदिच्छा इथूनच. बायऽऽपिंपोड्यात ठरलाबहिष्काराचा निर्णयफलटणचे राजे हे तसे साताºयाच्या थोरल्या राजेंचे गुरू...परंतु ‘गुरुची विद्या गुरुलाच’ देण्यात नेहमीच पटाईत असणाºया थोरल्या राजेंना नामोहरम करण्यासाठी फलटणकर आसुसलेले. इतकी वर्षे साताºयाचे धाकटे राजे थोरल्यांसोबत असल्यानं फलटणकर नाईलाजानं शांत बसलेले.. परंतु गेल्या वर्षी पालिकेत बोगस मनोमिलनाचा फुगा फुटल्यानंतर सारे पत्ते ओपन झाले. शस्त्रं उघडपणे परजली गेली. पाठीवरचा वार आता थेट छातीवर होऊ लागला. त्याचाच सारा परिपाक बहिष्कारात उतरला...गेल्या आठवड्यात पिंपोड्यात ‘घड्याळ’ बांधून सारे आमदार एकत्र आलेले. ‘कार्यक्रमाला कुणीही जाऊ नये,’ असा ठराव या बैठकीत मांडला गेला. त्याला बोपेगावचे आबा सूचक बनले. कºहाडच्या बाळासाहेबांनीही अनुमोदन दिलं. हे पाहून शशिकांत ल्हासुर्णेकर दचकले. मात्र, सगळ्यांचाच ‘सूर’ पाहून त्यांनीही ‘नूर’ बदलला. बारामतीकरांनी या कार्यक्रमालाच येऊ नये, यासाठी फिल्डिंग लावली गेली. फलटणच्या राजेंनी थेट थोरल्या बारामतीकरांना कॉल केला. ‘तुम्हाला साताºयाच्या राजेंसंदर्भात भेटायला यायचंय,’ अशी विनंती करताच तिकडून सावधपणे सांगितलं गेलं, ‘तुम्ही कशाला एवढं लांब येताय. मीच येतोय. तिकडं आल्यानंतर कार्यक्रमाअगोदर बोलू.’ फोन कट होताच काहीजणांचा डिसमूड झाला.. कारण बारामतीकर येणारच, याची खात्री पटलेली....पण राजेंच्या विरोधात ‘बेकी’ करण्यासाठी इतरांची ‘एकी’ झाल्याचं बारामतीकरांच्या लक्षात आलं. आजपर्यंतचा बारामतीकरांचा राजकीय प्रवास पाहता त्यांना कसल्याही ‘एकी-बिकी’शी कधीच देणं-घेणं नसतं. फक्त मुंबई-दिल्लीत सत्ता मिळविण्यासाठी मोजावी लागणाºया डोक्यांची संख्या शाबूत राहिली पाहिजे, हेच त्यांचं पक्कं सूत्र. म्हणूनच ते सातारी आले. आपला एकही आमदार उपस्थित नसताना ‘आम्हा सर्वांची साथ तुमच्यासोबतच!’ असा विश्वास (!) राजेंना देऊन गेले. असो. बारामतीकरांची एक खासियत. ते जे बोलतात, ते कधीच करत नसतात... अन् जे करतात, ते अगोदर बोलून दाखवत नसतात !