शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात; कोयना धरणात पाण्याची आवक वाढली, दरवाजे एकवरुन दोन फुटावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:52 IST

नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ..

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून धरण पाणलोट क्षेत्रातही चांगली हजेरी आहे. त्यामुळे धरणात आवक वाढू लागली आहे. कोयना धरणातीलपाणीसाठाही १०१ टीएमसीवर गेला आहे. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास कोयनेचे दरवाजे एकवरुन दोन फुटापर्यंत वर घेऊन विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागाला झोडपून काढलेले. मात्र, २० ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर तीन दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. पण, रविवारपासून पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सातारा शहरातही रिमझिम सुरू होता. तर साेमवारी पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतही पाणी आवक वाढू लागली आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २५, तर महाबळेश्वरला ३० मिलिमीटरची नोंद झाली. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत आहे. यामुळे धरणांत आवक सुरू आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५ हजार ४४४ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर पाऊस वाढल्याने सांयकाळी कोयनेत १७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

धरणात १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सायंकाळी चारनंतर धरणाचे दरवाजे एकवरुन दोन फुटापर्यंत वर घेण्यात आले. त्यामुळे दरवाजातून १६ हजार ८०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एेकूण १८ हजार ९०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यास कोयना धरणातून आणखी विसर्गात वाढ होण्याचा अंदाज आहे.

नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ..जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४ हजार ९७६ मिलिमीटर झाला आहे. यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ७४२ आणि कोयनानगरला ४ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पात १४३.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. याची टक्केवारी ९६.३५ टक्के आहे. तर मध्यम प्रकल्प सुमारे ८४ टक्के भरलेत. ७.३६ टीएमसी या प्रकल्पात पाणीसाठा झालेला आहे.