शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने धरणे भरली; पण सातारा जिल्ह्यात मान्सूनमध्ये घट झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:43 IST

सरासरी ७८४ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद

सातारा : जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता थांबला आहे. आतापर्यंतच्या चार महिन्यांच्या मान्सूनच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे आणि पाझर तलावही भरुन वाहत आहेत. पण, यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सुमारे १२ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. सरासरी ७८४ मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. याची सरासरी ही ८८६ मिलिमीटर इतकी आहे. या पावसावरच वर्षाचे गणित अवलंबून असते. शेती, पिण्याच्या पाणी योजनांसाठी हा पाऊसच महत्वपूर्ण ठरतो. एखाद्यावर्षी पाऊस कमी पडलातरी त्याचा शेती आणि पिण्याच्या पाणी योजनांवरही मोठा परिणाम होतो. यंदा मात्र, मान्सूनचा पाऊस कमी पडला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरी ८८६ मिलिमीटर पर्जन्यमान होते. यावर्षी मात्र ७८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुमारे ८८ टक्के पाऊस झालेला आहे. यामध्ये जून महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला असला तरी तो सरासरीएवढा पडला नव्हता. त्यामुळे मान्सूनच्या हंगामात जिल्ह्यात १२ टक्के पावसाची तूट राहिलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

मागील वर्षी १२६ टक्के पाऊस..मागील वर्षी जून महिन्यात मान्सूनला सुरुवात झाली होती. चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १ हजार १२४ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झाले होते. याची सरासरी १२६ टक्के इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३८ टक्के कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

चार तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षी कमी..जिल्ह्यात सप्टेंबरअखेर सरासरी ७८४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. ८८ टक्के हा पाऊस आहे. तसेच जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. तर सात तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये सातारा तालुक्यात सरासरीच्या ९५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

जावळीत १०६ टक्के, पाटण ६०, कराड १०५, कोरेगाव तालुका ९२ टक्के, खटाव १२८, माण १२३, फलटण १०७, खंडाळा तालुका १०८, वाई ११४ आणि महाबळेश्वर तालुक्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झालेला आहे. यावरून पावसाचे तालुके समजल्या जाणाऱ्या सातारा, पाटण, महाबळेश्वरमध्ये पर्जन्यमान कमी झाल्याचेही स्पष्ट झालेले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dams Overflow, Yet Satara Faces Monsoon Rainfall Deficit

Web Summary : Satara district's dams overflowed, but monsoon rainfall is 12% below average. Some areas received less than average rain, impacting agriculture and water schemes despite full reservoirs.