शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Satara: कोयनेचा पाऊस दोन हजारी; धरणात एक टीएमसीने वाढ

By नितीन काळेल | Updated: July 17, 2024 19:18 IST

जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ३५ मिलीमीटरची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला २ हजार ३३८ मिलीमीटर झाले आहे. तसेच कोयनेच्या पावसानेही दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडलाय. धरणात एक टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणसाठा ४३.०९ टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तरीही या पावसात सातत्य नाही. कधी पावसाचा जोर राहतो. तर काहीवेळा उघडझाप सुरू असते. त्यातच चार दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ११ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला १९ मिलीमीटरची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला आतापर्यंत २ हजार ०१ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे १ हजार ८०४ मिलीमीटर पाऊस पडला. यंदा महाबळेश्वरच्या पावसाचे प्रमाण कमी आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ११ हजार ८४४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. सकाळी ४३.०९ टीएमसी साठा झालेला.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर्व भागात उघडीप आहे. सातारा शहरातही बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण राहत आहे. कधीतरी रिमझिम स्वरुपाचा पाऊस होत आहे.

कोयनेत १७ टीएमसी पाणीसाठा अधिकजिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. १७ जुलैपर्यंत कोयनानगर येथे १ हजार ९४ मिलीमीटर पाऊस झालेला. तर नवजा येथे १ हजार ५८६ आणि महाबळेश्वरला १ हजार ५७१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. त्या तुलनेत यंदा अधिक पाऊस आहे. तसेच कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १७ टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षी १७ जुलैपर्यंत २६.१६ टीएमसी पाणीसाठा झालेला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान