कोयना परिसरात पाऊस सुरूच : साठा १८ टीएमसीच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:06 IST2019-07-06T13:05:23+5:302019-07-06T13:06:42+5:30
जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत

कोयना परिसरात पाऊस सुरूच : साठा १८ टीएमसीच्या वर
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोयनेत १८.१६ टीएमसी साठा झाला होता. तर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे आणि गुरूवारी दिवसभरात एकूण १२२.३१ व २४ तासांत सरासरी ९.६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात २२ जून नंतर मान्सूनचे आगमन झाले. तेव्हापासून सतत कोठे ना कोठे पाऊस होतच आहे. सुरूवातीच्या काळात माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा तालुक्यात कमी अधिक फरकाने पाऊस झाला. मात्र, नंतर या पावसाने उघडीप दिलेली आहे. तर पश्चिम भागात सुरुवातीपासून पाऊस कोसळतोय. कधी कमी, कधी अधिक पाऊस होत आहे. मात्र, कोयना धरण परिसर, नवजा, महाबळेश्वर, बामणोली, तापोळा भागात सतत पाऊस आहे. कधी- कधी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंतच्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- १८.८७ (३०५.५३), जावळी- १७.१५ (३२५.०२), पाटण-१५.५५ (२४१.६१), कºहाड -६.६९ (१६४.२३), कोरेगाव- २.७८ (१५२.२२), खटाव- २.४३ (९३.२४), माण - ०.२९ (६३.७०), फलटण - ० (५८.३३), खंडाळा- ०.५० (९५.६०), वाई- ३.८६ (१४३.२७), महाबळेश्वर-५४.२० (१०८५.०३). याप्रमाणे आजपर्यंत एकूण २७२७.७७ तर सरासरी २१२.७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी कोयना धरणाची पाणीपातळी २०५१ फूट झाली असून १८.१६ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंतची पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना -७६ (८७३), नवजा - ४४ (१०६९) तर महाबळेश्वर ६५ (१०७९) .