शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:15 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग

ठळक मुद्दे झड्या लावण्यास प्रारंभ

अजित जाधव ।महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग महाबळेश्वरमधील शासकीय इमारती, घरं तरी कसं सुटतील. मुसळधार पावसापासून इमारतींना वाचविण्यासाठी गवतांपासून झड्या लावल्या जातात. हे त्यांचे रेनकोट. झड्या लावण्याच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे.

पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ठ आहे. या वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते.सध्या त्याच गडबडीत महाबळेश्वरचे नागरिक आहेत. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या म्हणजेच झडपा लावल्या जातात. काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केले. काहींना पत्राच्या झडपा लावल्याचे दिसत आहे.

पावसाळी वातावरणापासून इमारतीचे संरक्षण व्हावे, याासाठी गवताच्या झड्या वापरण्याची येथील फार जुनी व खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. येथील बहुतेक ठिकाणी झड्याच वापरात यायची. या झड्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठ्या किंवा बाबू यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीच्या वरचे आवरण लांब-लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेण्याचे काम हे आवरण करते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते.

गवताच्या पारंपरिक झड्यामुळे पावसाळ्यात धो-धो पाऊस पडूनही इमारतींच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडही पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्याचे रक्षणही होत असे. तसेच या झड्यांसाठी लागणारे सर्व साधनसामुग्री याच परिसरातील जंगलातच उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणेही कमी खर्चिक आहे. पाण्याने कुजलेले गवत गुरांच्या गोट्यात गुरांना बसण्यासाठी वापरता येते. नंतर ते शेतात खत म्हणून वापरले जाते. तसेच झड्याच्या निकामी झालेल्या काठ्या पावसानंतर जळण म्हणून नागरिक वापरतात.जून महिनाअखेर ठरणार अग्निपरीक्षाइमारतींना लावल्या जाणाºया झड्या खºया अर्थाने पर्यावरणपूरक आहे. झड्या बनविण्यासाठी खूप मेहनत आहे. गवत, काठ्या जंगलातून आणण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. पूर्वीपेक्षा अलीकडे दिवसेंदिवस या गोष्टी किचकट व खर्चिक होऊ लागल्या आहेत. नव्या पिढीची बदलती मानसिकता, त्याच्यात कष्ट करण्याची पूर्वीच्या लोकांइतकी क्षमताही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान