पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:10+5:302021-09-11T04:41:10+5:30
तरंगत्या तराफ्यावर मूर्ती प्रतिष्ठापना... सातारा शहरातील मानाच्या आझाद हिंद मंडळाने सोमवार पेठेतील दत्त मंदिरापुढेच आकर्षक कापडाची रंगीबेरंगी कमान करून ...

पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला...
तरंगत्या तराफ्यावर मूर्ती प्रतिष्ठापना...
सातारा शहरातील मानाच्या आझाद हिंद मंडळाने सोमवार पेठेतील दत्त मंदिरापुढेच आकर्षक कापडाची रंगीबेरंगी कमान करून मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. पंचमुखी गणेश मंडळाने गणेश मंदिरातच छोटी गणेश मूर्ती स्थापन केली आहे. सोमवार पेठेतील फुटका तलाव गणेश मंडळाने तरंगत्या तराफ्यावर आकर्षक कमान आणि मंडप उभारून यामध्ये भव्य शेंदरी रंगाची गणेश मूर्ती स्थापन केली आहे.
(चौकट)
मोदक खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड
घरोघरी स्थापन केलेल्या गणेशाला विविध प्रकारचे नैवेद्य आवडतात. यामध्ये सातारी कंदी पेढे, मावा, गुलकंद, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, पिस्ता, ऑरेंज आदी प्रकारचे माव्याचे मोदक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या मोदकांच्या खरेदीसाठी सातारकरांची रात्री उशिरापर्यंत मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होती.
(चौकट)
कडेकोट पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक व होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साधेपणाने आणि शांततेने साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंडपात जाऊन गणेशमूर्तींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यावर प्रशासनाने प्रतिबंध घातले आहेत.