शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचा विसर्ग वाढला; धोममधूनही पाणी सोडले; कृष्णा नदी पातळीत वाढ 

By नितीन काळेल | Updated: August 1, 2023 12:36 IST

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागलाय. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. आता धोममधनूही विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. तर कोयना धरणातील साठा ७४ टीएमसीवर गेल्याने पुन्हा वीजगृहाच्या युनीटमधून विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील एक महिन्यांपासून पाऊस होत आहे. सुरुवातीला जोरदार, त्यानंतर उघडझाप, परत जोरदार असे एक महिन्यात पावसाचे स्वरुप राहिलेले आहे. त्यातच मागील १५ दिवसांत पश्चिमेकडील कोयनेसह नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. तसेच प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर राहिला. त्यामुळे मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला.त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र, कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ७४.२२ टीएमसी झाला होता. तर धरणात २४ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यातच पाऊस सुरू असल्याने कोयना पायथा वीजगृहातील दुसरे युनीटही पुन्हा सुरू करण्यात आले. त्यातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोयना धरण पायथा वीजगृहातून एकूण २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना करण्यात आलेली आहे.वाई तालुक्यात धोम आणि बलकवडी ही धरणे आहेत. बलकवडीचे पाणी धोममध्ये येते. सध्या या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून बलकवडीतून विसर्ग करण्यात आल्याने धोम धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणाच्या दरवाजातून सोमवारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कृष्णा नदीत जात आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे.

नवजाला १६३ मिलीमीटर पाऊस...पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची महिन्यानंतरही पावसापासून सुटका झालेली नाही. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस हा नवजाला १६३ मिलीमीटर पडला. यानंतर महाबळेश्वरला १२४ आणि कोयनानगर येथे ९७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणKoyana Damकोयना धरणRainपाऊस