शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच; कोयनेतून ५२ हजार क्यूसेक विसर्ग; कण्हेरमधूनही वाढ 

By नितीन काळेल | Updated: September 6, 2024 12:47 IST

सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ...

सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ५२ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून २४ तासांत नवजाला १०३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम भागात प्रमाण चांगले आहे. कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे ही धरणे भरल्याच जमा आहेत. त्यातच सततच्या पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ५४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर नवजा येथे १०३ आणि महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासून आतापर्यंतचा विचार करता नवजा येथे सर्वाधिक ६ हजार १९५ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही ५ हजार ८९३ आणि कोयनेला ५ हजार १७३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ३६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी रात्री ११ पासून सहा दरवाजे साडे पाच फूट उचलून सुमारे ५० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणातून एकूण ५२ हजार ८६ क्यूसेक वेगाने विसर्ग होत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण