साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:39+5:302021-06-27T04:25:39+5:30
सातारा : शहर पोलिसांनी दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ...

साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापा
सातारा : शहर पोलिसांनी दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनीच गुन्हे दाखल केले असून दोन्ही ठिकाणच्या कारवाईत रोकड आणि जुगार साहित्य जप्त केले.
सातारा येथील देगाव फाट्यावरील सातारा पालकर मटण शॉपच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुकंदर दिलावर शेख (वय ३४, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा), शंकर व्यंकट पवार (वय ३८, रा. अंगापूर, ता. सातारा), मालक शुभम घाडगे (रा. कोरेगाव, जि. सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १९८० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे.
सातारा येथील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १९३० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी कृष्णा रामदास देशमाने (वय २७, रा. वनवासवाडी, खेड, सातारा), रणजीत दत्तात्रय भवर (वय ३५, रा. खिंडवाडी, ता. सातारा), मालक चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.