पाचगणी येथे रिसॉर्टवर छापा; चार नर्तिकांसह सहा डॉक्टर ताब्यात
By दत्ता यादव | Updated: December 13, 2023 17:08 IST2023-12-13T17:07:36+5:302023-12-13T17:08:01+5:30
महाबळेश्वर येथे भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकानावरील रिसोर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला.

पाचगणी येथे रिसॉर्टवर छापा; चार नर्तिकांसह सहा डॉक्टर ताब्यात
दत्ता यादव, सातारा : पाचगणी ता. महाबळेश्वर येथे भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकानावरील रिसोर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी चार नर्तिकांसह सहा डॉक्टरांनाही ताब्यात घेतल्याने. यामध्ये डॉक्टरांचा सहभाग असल्याने हाय प्रोफाइल पार्टीची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगणी जवळच असणाऱ्या कासवंड गावातील रिसॉर्टमध्ये डॉक्टर लोकांसमोर युवतींची तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करीत नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.
पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहाच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील ऐक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच पोलिसांना सापडले. छापा टाकला त्यावेळी नर्तिका नाचत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पाचगणी पोलीस पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. अधिक तपास पांचगणी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.