शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या मध्यवस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 30 जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 14:30 IST

मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कऱ्हाड (सातारा) : शहरातील मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

शहरात पालिका इमारतीनजीक सांस्कृतिक भवन आहे. या सांस्कृतिक भवनालगत इतर दुकानगाळे असून, खाली पार्किंगचीही व्यवस्था आहे. संबंधित इमारतीनजीक जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली होती. उपअधीक्षक ढवळे यांनी याबाबतची माहिती विशेष पथकाला देऊन माहितीची खातरजमा करण्याची सूचना दिली. पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जुगार अड्डा चालविला जात असल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत हा अड्डा चालविण्यात येत होता. त्यामध्ये अनेकजण जुगार खेळण्यासाठी येत होते. रविवारी पहाटे उपअधीक्षक ढवळे यांच्यासह पोलीस पथकाने अचानक त्याठिकाणी छापा टाकला. 

पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्या काहीजणांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतले. तसेच तेथून दुचाकी, मोबाईलसह सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही युवकांसह प्रतिष्ठितांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. दरम्यान, जुगाराच्या या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यवस्तीत चालविला जाणारा हा अड्डा गत काही दिवसांपासून परिसरात चर्चेचा विषय बनला होता. मात्र, पोलीस कारवाईमुळे हा अड्डा आता उद्ध्वस्त झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर