तडवळे उपसरपंचपदी राहुल भोईटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:22+5:302021-07-09T04:25:22+5:30

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील तडवळे (सं) वाघोलीच्या उपसरपंचपदी राहुल ऊर्फ रायबा बाळासाहेब भोईटे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच ...

Rahul Bhoite as Tadwale Deputy Panch | तडवळे उपसरपंचपदी राहुल भोईटे

तडवळे उपसरपंचपदी राहुल भोईटे

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील तडवळे (सं) वाघोलीच्या उपसरपंचपदी राहुल ऊर्फ रायबा बाळासाहेब भोईटे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच नाना बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

तडवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी राहुल भोईटे यांचा एकमेव अर्ज आला होता. यासाठी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अजित भोईटे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी उपसरपंचपदी राहुल भोईटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य पार्वती भोईटे, सोनाली भोईटे, शोभा चव्हाण, सागर खूसपे, सीमा भोईटे, सीमा जगताप हे सदस्य व ग्रामसेवक धनंजय सस्ते उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योजक आबा धुमाळ, सुहास जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हाफ फोटो...

Web Title: Rahul Bhoite as Tadwale Deputy Panch