वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST2021-02-10T04:39:39+5:302021-02-10T04:39:39+5:30

महेश नागाप्पा थोरात (वय २१, रा. शाहू चौक, कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत संतोष बाळकृष्ण पाटणकर यांनी शहर ...

Pushback to traffic police; Crime on one | वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; एकावर गुन्हा

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; एकावर गुन्हा

महेश नागाप्पा थोरात (वय २१, रा. शाहू चौक, कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत संतोष बाळकृष्ण पाटणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमीसंगमावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची गाडी चालवणाऱ्या स्टॉलवाल्यास आरोपी महेश थोरात हा मारहाण करत होता. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी संतोष पाटणकर यांनी हस्तक्षेप केला. याचा राग मनात धरून पाटणकर हे गणवेशात असतानाही महेश थोरात याने त्यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्याबरोबर कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांनाही शिवीगाळ करत दमदाटी करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला. याबाबत संतोष पाटणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, महेश थोरात याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Pushback to traffic police; Crime on one