शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तहसील कार्यालयात जनतेची लूट

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

हात ओला केल्यासच काम : सर्वसामान्य जनतेला केलं जातंय लक्ष्य

पाटण : नुकत्याच आयोजित केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यक्रमात धडे घेतल्यानंतरही पाटण तहसील कार्यालयाच्या आवारातील पोलीस, दुय्यम निबंधक, स्टॅम्प व्हेंडर, तहसील कर्मचारी, तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेची लूट करत असून, अनेकजण यात बळी पडत आहेत. दाखला किंवा जमीन खरेदी-विक्री व्यवहार असो, पन्नास रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतची मागणी पूर्ण करावी लागत आहे.विविध प्रकारचे दाखले, सेतू विभाग, धान्य पुरवठा विभाग, जमीन खरेदी-विक्री व्यवहार किंवा प्रतिज्ञापत्र करायचे असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेली अवाजवी मागणी पूर्ण केल्याशिवाय काम होत नाही, हा अनुभव येथे येणाऱ्या सर्वांनाच आलेला आहे. पोलीस ठाण्यात तर पासपोर्ट असो किंवा चारित्र्य पडताळणी दाखल्याचे काम असो, प्रत्येकाकडून २०० रुपये घेतले जात आहेत. तहसील आवारातील लिखाई काम करणारे तर शासकीय दरपत्रकाकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या जनतेची लूट करत आहेत. धान्य दुकानदारांकडून दरखेपेस ५०० रुपये घेतले जात आहेत. सेतू विभागात २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतची नोट हातावर ठेवल्याशिवाय दाखल्यांवर सही होत नाही.हे सर्व लुटीचे प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्ञात असतात. मात्र ‘तू खा आणि मला दे’ अशी गत असल्यामुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’असे चित्र दिसत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी तर जनतेला बकरा बनवून ५ ते १० हजारांपर्यंतच्या रकमा वसूल करून ‘मिटवामिटवी’ करत आहेत. याबाबतच्या तक्रारी अनेकांनी पोलीस निरीक्षकांच्या कानावर घातल्या आहेत. ही लूट थांबविण्याची मागणी दुर्गम भागातील ग्रामस्थ करीत आहेत. (प्रतिनिधी)तालुक्यातील जनतेला शासकीय कार्यालयात येणारा वाईट अनुभव आणि होणारी आर्थिक पिळवणूक यासाठी आता नवीन आमदारांनी पुढाकार घ्यावा. तशा सूचना पोलीस, महसूल, पंचायत व खास करून दुय्यम निबंधकांना द्याव्यात. तरच गैरव्यवहारांना आळा बसेल. - रवींद्र घोरपडे, हुंबरणे, ता. पाटणतालुक्यातील प्रशासन लोकाभिमुख करणार, असे नवनियुक्त आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. त्यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच घेतली. मात्र जनतेला लुटणाऱ्यांमध्ये फरक पडलेला दिसत नाही.