अभ्यागतांना तत्पर सेवा देऊ : कृष्णा सांगवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:58+5:302021-04-01T04:39:58+5:30
वडूज : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यागतांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, याची दक्षता घेतली जाईल, त्यांना तत्पर सेवा दिली जाईल,’ ...

अभ्यागतांना तत्पर सेवा देऊ : कृष्णा सांगवेकर
वडूज : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यागतांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, याची दक्षता घेतली जाईल, त्यांना तत्पर सेवा दिली जाईल,’ असे आश्वासन वडूजचे भूमिअभिलेख उपअधीक्षक कृष्णा सांगवेकर यांनी ग्राहक पंचायतीला दिले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयातील गर्दी कमी व्हावी, आपल्या कामासाठी विनाकारण अभ्यागतांना हेलपाटे मारावे लागू नयेत, सर्वच शासकीय कार्यालयांनी ही बाब लक्षात घ्यावी, अशी मागणी भूमिअभिलेख उपअधीक्षकांकडे अखिल ग्राहक पंचायतीने केली.
यावेळी मुख्य सहायक सुनील म्हस्के, भूकरमापक आर. आर. नरळे, अनिरुद्ध वाळूंजकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी, तालुकाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी, सचिव बचाराम साबळे, मुन्ना मुल्ला, राकेश सोनटक्के उपस्थित होते.