सातारा शहरातील प्रमुख महाविद्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:41 IST2018-09-29T13:35:56+5:302018-09-29T13:41:33+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

सातारा शहरातील प्रमुख महाविद्यालयासमोर निदर्शने
सातारा : आपल्या विविध मागण्यांसाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर प्राध्यापकांनी जोरदार निदर्शने केली.
उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी ‘एमपुकटो’च्या वतीने प्राध्यापकांचासंप सुरू आहे. शहरातील प्राध्यापकांनी शनिवारी निदर्शने करून शासनाविरुद्ध घोषणा दिल्या.