शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:58 IST

'भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू'

प्रवीण जाधवपाटण : महिला कुस्तीपट्टूंवर अन्यायप्रकरणी ब्रिजभूषण सिंग व या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन अमानुषपणे चिरडणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्यावतीने पाटण येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. कुस्तीपटू महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंगला तत्काळ अटक करून कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.आंदोलनामध्ये पाटण तालुक्यातील कुस्तीपट्टू, युवक, महिला, युवती, खेळाडू व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी आंदोलनकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले, ‘दिल्लीत ३६ दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांवर दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमानवी आणि जुलमी कारवाई केली. आंदोलनकर्त्या महिला व त्यांच्या समर्थकांना फरफटत नेऊन डांबून ठेवले. ही कारवाई होत असताना दीड किलोमीटर अंतरावर नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात सुरू होता. त्याच दरम्यान लोकशाहीच्या मोठ-मोठ्या आणाभाकादेखील घेतल्या जात होत्या.एकीकडे बेटी बचाव-बेटी पढावची घोषणा द्यायची आणि दुसरीकडे देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून पदके जिंकणाऱ्या मुलींवर अमानुष पद्धतीने कारवाई करायची आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचे. या ढोंगी सरकारचा पाटण तालुक्यातील जनता निषेध करत आहे. हे सरकार त्यांच्या पक्षाचा खासदार ब्रिजभूषणला वाचविण्यासाठी हे हुकूमशाही वृत्तीचे, महिला विरोधी कृत्य करत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. भविष्यात जनता रस्त्यावर विरोध प्रदर्शन करू आणि भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू, असा विश्वास आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जानुगडे, शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, स्नेहल जाधव, गुरुदेव शेडगे, रेखाताई जाधव, पंचायत समिती माजी सदस्या मिलन सय्यद, युवक उपाध्यक्ष सम्राट घेवारी, योगेश महाडिक, विजय घाडगे, दिनकर धामणकर, राष्ट्रवादीचे संदीप लोहार, विश्वजीत पाटणकर, मनोहर यादव, डॉ. दीपक डांगे, किशोर लोहार, सूरज पंधारे, अष्पाक शैख, प्रवीण भिसे ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWrestlingकुस्तीBJPभाजपा