शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

साखर कारखानदार तुपाशी; ऊस उत्पादक शेतकरी उपाशी!, दीपावलीच्या दिवशीच कऱ्हाडात शेतकऱ्यांचे आंदोलन

By प्रमोद सुकरे | Updated: October 24, 2022 18:28 IST

यावेळी कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

कऱ्हाड : सोमवारी दीपावलीच्या दिवशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाड तहसीलदार कार्यालय येथे खर्डा भाकरी खाऊन साखर कारखानदारांचा जाहीर निषेध केला. यावेळी कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.मागील ५ वर्षामध्ये साखरेचा बाजार भाव २२०० रुपये वरून ३५०० रुपये पर्यंत साखरेला प्रतिक्विंटल भाव वाढलेला असताना सुद्धा मागील तीन- वर्षात ऊसाला ३१०० रुपये वरून २८०० रुपयापर्यंत  कारखानदारांनी उसाचा भाव कमी केलेला आहे. साखरेचा भाव वाढलेला असताना सुद्धा उसाचा भाव कमी का झाला याचा विचार ऊस उत्पादकांनी केला पाहिजे. मागील ५ वर्षात ऊसाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढलेला आहे शेअर भांडवल दीडपट वाढलेले आहे. मात्र उसाचा दर मागील तीन वर्षात कमी केल्याबद्दल साखर कारखानदारांचा बळीराजा शेतकरी संघटनेने दिपवाळी दिवशी तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन कारखानदारा विरोधात घोषणा देऊन कारखानदारांचा निषेध करण्यात आला.येणाऱ्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करूनच ऊसाला तोड सुरू करावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड घेणार नाहीत याची नोंद साखर कारखान्यांनी घ्यावी. बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत साखर कारखानदार उसाचा दर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत आपल्या शेतातील व गावातील ऊस तोडी घेऊनयेत व घेतल्यास ऊस तोडी व उसाची वाहतूक थांबवण्यात यावी. तरच आपल्या ऊसाला योग्य भाव मिळणार आहे.  या आंदोलनात पंजाबराव पाटील, बी जी  पाटील, प्रदेशाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हाध्यक्ष उत्तम अण्णा खबाले, पोपट जाधव ,सचिन पाटील, दीपक पाटील, शंभुराजे पाटील, गणेश शेवाळे, युवा अध्यक्ष बाबा मोहिते, सागर कांबळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने