शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:56 IST

..तर टोल नाही टोले देऊ !

उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारकपणे टोलवसुली केली जात आहे. याच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी शेकडो चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोलनाक्याची सातारा ते कऱ्हाडला जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले.उंब्रजसह परिसरातील शेकडो नागरिकांनी चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तासवडे टोल नाक्याची सातारा-कऱ्हाड वाहतूक रोखली. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कऱ्हाड पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये-जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांत नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी उद्धवसेनेचे कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी निवेदन दिले होते. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘न्हाय’च्या कोल्हापूर कार्यालयास माहिती देऊन शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबल्याने स्थानिकांचा टोल कापला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून समन्वय काढून अडचणीतून मार्ग काढणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

..तर टोल नाही टोले देऊ !आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधी शांत आहेत. नागरिकांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत का? टोल नाक्यावर ये-जा करीत असताना स्थानिक नागरिकांचे वाहन सोडले जाते. गाडी टोल पास करून पुढे आल्यानंतर टोल कटिंग मेसेज येतो. हा वाहनधारकांच्या खिशावर दरोडा आहे. हे त्वरित न थांबल्यास टोल नाहीच पण टोले दिले जातील, असा इशारा उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी दिला.

टोलनाका स्थापनेपासून टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. वाहनधारकांच्या नकळत त्यांचे टोल कट होत आहेत, हा अन्याय स्थानिक कदापि सहन करणार नाहीत. - सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कऱ्हाड.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाagitationआंदोलन