शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Lok Sabha Election 2019 सातारा अन् माढ्यात प्रचार तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:57 PM

सातारा : एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या चर्चेचा विषय राहिलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ...

सातारा : एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या चर्चेचा विषय राहिलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आता सार्वजनिक प्रचार थांबला असला तरी गृहभेटी, छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर वाढणार आहे. तर उमेदवारांची खरी परीक्षा ही मंगळवारी असणार आहे. २३ एप्रिलला मतदान होणार असून, मतदारराजा कौल कोणाला देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सातारा जिल्हा हा दोन लोकसभा मतदार संघामध्ये विभागला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा, वाई, कोरेगाव या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. तर माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश होेतो. सर्वात जास्त नाट्यमय घडामोडी या दोन्ही लोकसभा मतदार संघात घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा आणि माढ्याकडे लागले आहे.सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व मागील दहा वर्षांपासून उदयनराजे भोसले हे करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र, शरद पवार यांनी उदयनराजेंनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या अणि उदयनराजेंचा प्रचार सुरू केला. उदयनराजेंच्या विरुद्ध माथाडी नेते नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. माथाडी कामगार नेता म्हणून प्रतिमा असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, जागा वाटपामध्ये साताऱ्याची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.माढा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना विरोध होत असल्याचे पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पुन्हा त्यांनी माघार घेतली. दरम्यान, राजकीय घडामोडीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्याचवेळी भाजपच्या पाठिंब्याने सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष असलेले संजय शिंदे यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात भाजपने काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मैदानात उतरवले.मुख्यमंत्री अन् शरद पवारांच्या सभासातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, नेत्यांच्या सभा झाल्या. सर्वात अधिक नेत्यांच्या सभा झाल्या त्या माढा मतदारसंघात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अकलुजला सभा घेतली. माढा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा तर शरद पवार यांनी चारवेळा सभा घेतली. तसेच मंत्री नितीन गडकरी, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याही सभा झाल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक