शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कराडात भरधाव डंपरच्या धडकेत प्राध्यापिका जागीच ठार, अपघातानंतर चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:09 IST

बारा फूट फरफटत नेले

कराड (जि.सातारा) : डबर वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या जोराच्या धडकेत डॉ. सुषमा आनंदा कीर्तने (वय ५४, रा. गजानन हौसिंग सोसायटी, ता. कराड) या प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कराड-विटा मार्गावर जनता बाजार समोरील चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघात घडल्यानंतर चालकाने पलायन केले. तर घटनास्थळावरून डंपर पोलिस ठाण्यात नेत असताना डंपरमधील दगड वाटेतच उतरविण्यात आल्याने घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी थेट शहर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे काहीकाळ पोलिस ठाणे आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सैदापूर विद्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. सुषमा कीर्तने या महाविद्यालय सुटल्यानंतर कराडमध्ये त्यांच्या दुचाकीवरून कामानिमित आल्या होत्या. जनता बाजार चौकातून दुचाकीवरून त्या निघाल्या असता त्याचवेळी कराड-विटा मार्गावरील कृष्णा नाका बाजूकडून विजय दिवस चौकाकडे दगड घेऊन एक डंपर (एमएच ५० एम ५४५४) ने प्राध्यापिका कीर्तने यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण धडक देत डंपरने दुचाकीसह कीर्तने यांना दहा ते बारा फूट अक्षरशः फरफटत पुढे नेले. त्यामुळे जखमी कीर्तने यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Professor Killed by Speeding Dumper in Karad; Driver Flees

Web Summary : In Karad, a speeding dumper fatally struck Professor Sushma Kirtane. The driver fled the scene. Outraged citizens questioned the police after noticing stones being unloaded from the dumper en route to the police station, causing tension.