‘पर्ल्स’ची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू

By Admin | Updated: June 24, 2016 00:45 IST2016-06-23T23:50:36+5:302016-06-24T00:45:02+5:30

लोढा समितीचा आदेश : गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा

The process of selling Perles' property continues | ‘पर्ल्स’ची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू

‘पर्ल्स’ची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू

सातारा : न्या. आर. एम. लोढा समितीने पी. एस. एल. (पर्ल्स) कंपनीची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गुंतवणूकदारांना लवकरच न्याय मिळेल, अशी माहिती अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेचे जिल्हा निमंत्रक कॉ. शामराव चिंचणे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. आर. एस. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती प्रस्थापित केली. या समितीने कार्यवाही सुरू केली असून, वर्तमानपत्रांतून तसेच सेबीच्या संकेतस्थळावर जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या जाहीर सूचनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समस्त संपत्ती विकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामध्ये पी.ए.सी.एल.लि. ला गुंतवणूकदारांना परतफेड करणे आवश्यक आहे. पर्ल्सच्या संपत्तीबाबत समिती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्थेने कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध सर्वसामान्य लोकांना ताकीद दिली होती व पी.ए.सी.एल. लि. यांच्या सहयोगी समूह कंपन्या, कर्मचारी, संचालक इतर आदींचे मालकीच्या किंवा सीबीआय व इतर संस्थेने जप्त करण्यात आलेल्या पीएसीएलची संपत्तीबाबत खरेदी किंवा विक्री करू नये. या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नयेत. कोणी व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल व कारवाई पात्र ठरेल असे समितीने जाहीर केले असून, पीएसीएल गुंतवणूकदारांनी समितीच्या सूचनेपर्यंत कागदपत्रांबाबत कंपनी किंवा इतरांशी व्यवहार करू नये, या कंपनीमध्ये नवीन गुंतवणूक किंवा हप्ते भरू नयेत.
गुंतवणुकीचे दस्तऐवज स्वत:कडे ठेवून समितीच्या विहीत नमुण्यामध्ये जोडपत्रांसह अर्ज दाखल करावेत, अशी ताकीद व सूचना समितीने दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The process of selling Perles' property continues