‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:43+5:302021-09-11T04:41:43+5:30
चाफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण चाफळ येथील ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
चाफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण चाफळ येथील समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकताच पार पडले.
माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या रुपाली पवार, चाफळचे सरपंच आशिष पवार, प्राचार्य ए. जे. कुंभार, केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल चाफळ समर्थ विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी सानिका संभाजी बाबर हिचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक ई. ए. कुंभार, संदीप शिरतोडे, वसतिगृह अधीक्षक संभाजी बाबर, उमेश सुतार यांच्यासह शिक्षक, पालक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.