शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: साताऱ्यात स्वबळावरील शिंदेसेनेला आमदारांचाच धक्का! पत्नीला मिळवून दिली भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:43 IST

Satara ZP Election 2026: महायुतीत जिल्ह्यात कलह : पण खटाव, कोरेगाव अन् साताऱ्यात तह

सातारा : जिल्ह्यात स्वबळावर लढणा-या भाजपाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र येण्यासाठी खलबते सुरू आहेत. त्याचवेळी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यात शिंदेसेने भाजपसोबत तह केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी भाजप चिन्हावर खटाव गटासाठी अर्ज दाखल केला. खेड आणि कोडोली गटांत भाजपा उमेदवारांनी आमदार शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांच्या उपस्थितीत अर्ज भरले आहेत. तर कोरेगाव तालुक्यात भाजपाने उमेदवार न देता शिंदेसेनेशी तह केल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीची बैठक घेतली. मात्र, भाजपाचे दोन्ही मंत्री आणि दोन्ही आमदारांनी पाठ फिरवली. औपचारिकता म्हणून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना पाठविल्याने शिंदेसेनेतून नाराजी व्यक्त झाली. भाजपाची वाढती महत्त्वाकांक्षा दिसू लागल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेनेतील नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत बैठका सुरू आहेत.

कोरेगाव मतदारसंघात सोयीचे उमेदवार...भाजपातील प्रमुख नेत्यांची बैठक साताऱ्यात सोमवारी झाली. बैठकीला मात्र शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी हजेरी लावली. त्याचवेळी कोरेगाव मतदारसंघात भाजपसोबत आमदार शिंदे हे तह करणार असल्याची चर्चा होती. या बैठकीवेळी आमदार शिंदे यांनी कोडोली आणि खेड मतदारसंघातील ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला भाजपाविरोधात काम केले, त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार ठरवताना भाजप आणि आमदार महेश शिंदे यांनी परस्परांची अडचण होणार नाही, याची काळजी घेत सोयीचे उमेदवार दिल्याचे दिसून आले.

साताऱ्यात भाजप, कोरेगावात शिंदेसेना...काेरेगाव विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यातील गटांचा समावेश आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील कोडोली आणि खेड गट येतात. याठिकाणी भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज भरला. यावेळी खुद्द आमदार शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांची उपस्थिती होती. त्याचवेळी कोरेगाव मतदारसंघातील चार गटात शिंदेसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तिथे भाजपाने उमेदवार दिले नाहीत. खटाव गटात आमदार यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी अर्ज दाखल केला.

महायुतीत पेच झाल्याने पक्षांतर...आमदार महेश शिंदे हे भाजपात असताना त्यांनी २०१९ च्या विधानसभेची तयारी केली होती. त्यावेळी कोरेगाव मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेला गेल्याने उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. त्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी शिवबंधन बांधले. पुढे शिवसेनेत फूट पडली व त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपमध्येच कार्यरत होत्या. त्यामुळे शिंदे यांनी बंडखोरी केली नसल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Shinde Sena MLA's Wife Runs on BJP Ticket

Web Summary : In Satara ZP polls, Shinde Sena aligns with BJP in some areas. MLA Mahesh Shinde's wife is contesting on a BJP ticket from Khatav. Negotiations for alliances continue amidst shifting political dynamics.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा