जावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:13 IST2021-04-14T16:10:00+5:302021-04-14T16:13:05+5:30
CoronaVIrus Education Satara : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित
कुडाळ : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू होती. अशातच एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल बाधित आला.
यामुळे शाळा व्यवस्थापननाने तत्काळ याची दखल घेऊन शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. यामध्ये ११ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले. यानंतर, शाळा व्यवस्थापनाने तत्काळ शाळा बंद केली असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.