कऱ्हाडात खासगी सावकाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST2021-03-17T04:40:58+5:302021-03-17T04:40:58+5:30

अजिंक्य शंकर हुकिरे (वय २७, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड, मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. ...

Private moneylender arrested in Karachi | कऱ्हाडात खासगी सावकाराला अटक

कऱ्हाडात खासगी सावकाराला अटक

अजिंक्य शंकर हुकिरे (वय २७, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड, मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकाने त्याच्या अडचणीसाठी अजिंक्य हुकिरे याच्याकडून दरमहा दरशेकडा १५ टक्के व्याजदराने २०२० साली २० हजार रुपये घेतले होते. या पैशाच्या मोबदल्यात जानेवारी २०२१ अखेर संबंधिताने हुकिरे याला २६ हजार रुपये परत केले. मात्र, तरीही व्याज व मुद्दल असे मिळून आणखी २० हजार रुपये देणे लागत असल्याचे सांगून हुकिरे हा संबंधिताला दमदाटी करीत होता. संबंधिताने आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांना मारहाण करून त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेतली. याबाबत संबंधिताने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विजय गोडसे, पोलीस नाईक संजय जाधव व सचिन साळुंखे यांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक गोडसे करीत आहेत.

Web Title: Private moneylender arrested in Karachi