शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Satara News: कंटेनरला पाठिमागून खासगी लक्झरी बसची धडक; एकजण ठार, चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 11:37 IST

मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत कंटेनरला पाठिमागून भरधाव खासगी लक्झरी बसने जोरदार ...

मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत कंटेनरला पाठिमागून भरधाव खासगी लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील एक प्रवाशी युवक जागीच ठार झाला. तर बस व्यवस्थापकासह चार जण गंभीर जखमी झाले. आज, शनिवार (दि.०१) मध्यराञीच्या सुमारास हा अपघात घडला. सुरज भिमराव शेवाळे (वय २७, रा.टाळगाव शेवाळेवाडी ता.कराड) असे मृताचे नाव आहे. हा भीषण अपघात एका कंपनीच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तीलिंग कृपा ही खासगी ट्रँव्हल्स लक्झरी बस (क्रं.एमएच-०१-डीआर-०१०८) निघाली होती. बसमध्ये ४३ प्रवाशी प्रवास करीत होते .दरम्यान, बस सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावच्या हद्दीत महामार्गावर एका हाँटेलसमोर आली असता एक मालट्रक वळण घेत असताना कंटेनर (क्रं.एनएल-०१-जी-४०६९) ला पाठिमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात आपल्या पत्नीसमवेत प्रवास करीत असलेले सुरज शेवाळे हे जागीच ठार झाले. तर, बसमधील व्यवस्थापक अकुंश बापूसो पाटील (वय ४२, रा. पणुंबरे जि. सांगली), प्रवाशी राजश्री अनिल मोरे (२९,रा,कराड), शंकर आनंदा बगाडे(४५, रा.बत्तीस शिराळा जि.सांगली), अमित महादेव पवार(२९, रा. किंद्रेवाडी जि.सांगली) हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगवडे व शिरवळ रेस्क्यू टिमचे सदस्य तसेच १०८ रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाले. जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु आहेत. सुरज शेवाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चालक केरबा सवणे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला अपघाताची  फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू