वहागावला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:59+5:302021-07-21T04:25:59+5:30

वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयातील रिया संदीप पवार हिने पाचशेपैकी पाचशे गुण मिळवत शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत. ...

Pride of meritorious students in Wahagaon | वहागावला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वहागावला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयातील रिया संदीप पवार हिने पाचशेपैकी पाचशे गुण मिळवत शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत. साक्षी संतोष पवार हिने ९७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, प्रियदर्शनी प्रशांत पवार हिने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय, कार्तिक रामचंद्र पवार व प्रगती शंकर पवार यांनी ९६.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक व प्रतीक्षा विकास पवार हिने ९६.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे. दहावीमधील ११३ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यामध्ये उत्तीर्ण झाले असून, २८ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अमृतराव पवार, संस्थेचे सचिव राहुल पवार, संदीप पवार यांच्यासह मान्यवरांनी सन्मान केला. धनंजय काळगावे उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

फोटो : २०केआरडी०१

कॅप्शन : वहागाव, ता.कऱ्हाड येथील अण्णाजी पवार विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अ‍ॅड.अमृतराव पवार, राहुल पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Pride of meritorious students in Wahagaon