महामार्गावरील वेगाची ‘किंमत’ तब्बल ३७ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:27+5:302021-09-05T04:44:27+5:30

सातारा : महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन आपले असले तरी, या वाहनावर नियंत्रण मात्र इंटरसेप्टर व्हेईकलचे आहे. त्यामुळे हे ...

The 'price' of speed on the highway is as high as Rs 37 lakh! | महामार्गावरील वेगाची ‘किंमत’ तब्बल ३७ लाख!

महामार्गावरील वेगाची ‘किंमत’ तब्बल ३७ लाख!

सातारा : महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन आपले असले तरी, या वाहनावर नियंत्रण मात्र इंटरसेप्टर व्हेईकलचे आहे. त्यामुळे हे व्हेईकल तुमच्या वेगाची किंमत ठरवतेय. जितका स्पीड जास्त, तितकी तुमची किंमतही मोजली जातेय. गेल्या चार महिन्यात महामार्गावरून जाणाऱ्या ३ हजार ७४५ वाहनांना तब्बल ३७ लाख रुपये केवळ वेगाची किंमत म्हणून मोजावी लागलीय.

महामार्गावरून भरधाव वाहने जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अलीकडे अधिकच वाढतेय. काही वेळेला धोकादायक वळण आणि खड्डे अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर येते. पण यापेक्षा सर्वाधिक ‘वेग’ हाच अपघाताचे मूळ कारण असल्याचा अहवाल वारंवार प्रशासनाकडे पोलीस देत असतात. रस्ता असेल तशी स्पीडची मर्यादा असते. जास्तीत जास्त ८० ते ८० च्या स्पीडने महामार्गावरून प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र, वाहन चालकांना हे सरकारी स्पीड रटाळवाणे वाटतेय. त्यामुळे अनेक वाहनचालक शंभर, १२०, १३० च्या स्पीडने महामार्गावरून वाहन चालवत असतात. अशाच वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी इंटरसेप्टर व्हेईकल महामार्गावर तैनात करण्यात आलेय. तुमच्या वेगाची किंमत आता हे वाहन ठरवतंय. हाय स्पीड असणाऱ्या वाहनांचे फोटो या व्हेईकलमधील मशीन काढून घेतेय. तुमचे वाहन किती स्पीडने जात होते, त्याची इत्यंभूत माहिती तसेच तुम्ही वाढविलेल्या वेगाची किंमत एक हजार वाहन चालकांच्या मोबाईलवर पाठविली जात आहे. अशा प्रकारच्या कारवाया महामार्गावर वाढल्या आहेत. मात्र, तरी सुद्धा वाहन चालक यामधून धडा घेत नाहीत. जेव्हा वाहन चालकाच्या मोबाईलवर मेसेज येतो, तेव्हाच त्यांना आपल्या वेगाची किंमत एक हजार रुपयांना पडली असल्याचे समजतेय. म्हणजे वाहन चालकांच्या जीवघेण्या वेगातूनही रोज शासनाच्या खात्यात पैसे जमा होतायेत. वास्तविक हे पैसे भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत असते. मात्र, अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा कधी त्यांचे वाहन पोलीस पकडतील, तेव्हा कुठे त्यांना आपल्या वाहनावर वेगाची किंमत एक हजार असल्याचे समजते. मागील थकबाकी भरल्याशिवाय पोलीस वाहन सोडत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना त्यांच्या वेगाची किंमत मोजावीच लागते.

चाैकट :

ऑनलाईन भरतायेत पैसे...

अनेक वाहन चालकांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज गेल्यानंतर, असे वाहन चालक ऑनलाईन पेमेंट भरत असतात, तर काही वाहन चालकांचा मोबाईल रजिस्टर नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचतच नाही. पण पोलिसांच्या मशीनमध्ये मात्र, वेगाची चूक नोंद केलेली असते. ती कधी ना कधी बाहेर येतेच आणि त्याची किंमत वाहन चालकांना चुकवावीच लागते.

Web Title: The 'price' of speed on the highway is as high as Rs 37 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.