शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालल्याने फोडणी झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते ...

सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते २,६०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे भाजीची फोडणी कमी झाली आहे तर डाळींचे दर स्थिर असून, कांदा आणखी स्वस्त झाला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांमधून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते. सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ५२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची ३९५ क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा ८० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते ७० रुपयेे, कोबी ३० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते ८० रुपये, दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर पालेभाज्यांचे दरही स्थिर होते.

कलिंगडाची आवक

साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ झालेली नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपये किलो दराने मिळत आहेत.

खाद्यतेलात वाढ कायम

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात १५ किलोचा सूर्यफूल तेल डबा २,५०० ते २,५५०, सोयाबीन २,१०० ते २,२०० तर शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,६००पर्यंत होता. तर एक लीटरचा शेंगदाणा तेल पाऊच १६५ ते १८०, सोयाबीन १३० ते १३५, सूर्यफूलचा पाऊच १६५ ते १७० रुपयांपर्यंत मिळत होता.

लसूण दर कमी

बाजार समितीत अनेक भाज्यांना कमी दर मिळत आहे. गवारला १० किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगला अवघा १०० ते २००, पावटा ३०० ते ३५० आणि भेंडीला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. तर लसणाचा दर २ ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत होता.

कोट :

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत आहेत. यामुळे दिलासा मिळत असला, तरी खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. त्यामुळे खर्चातही वाढ होत आहे.

- तेजश्री पाटील, ग्राहक

कोट

भारतात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोट

कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्च तरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

- परशुराम काटे, शेतकरी

.....................................................................................