रथोत्सवासाठी औंधनगरी सज्ज
By Admin | Updated: January 6, 2015 00:48 IST2015-01-05T23:44:03+5:302015-01-06T00:48:03+5:30
मान्यवरांची उपस्थिती : विविध भागातून भाविक दाखल

रथोत्सवासाठी औंधनगरी सज्ज
यमाईदेवीच्या वार्षिक रथोत्सवास आज (मंगळवार) दुपारपासून प्रारंभ होत आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रथोत्सव होणार आहे.
या वार्षिक रथोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, महिला बालकल्याण सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, खटाव पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, तहसीलदार विवेक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री यमाईचे मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीची रथात स्थापना व भव्य मिरवणूक औंधनगरीत निघणार आहे.
यात्रा कालावधीत क्रीडा स्पर्धा
औंधच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्वान स्पर्धा, क्रिकेट सामने, पाककला, शरीरसौष्ठव स्पर्धा, गिर्यारोहण, पोहणे तसेच कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
ऐतिहासिक ठेवा : भवानी चित्रसंग्रहालय
औंध येथील भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे इतिहास व विविध कलांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठा खजिना आहे. या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतील छायाचित्रकार तसेच हस्तकला, कौशल्यात पारंगत असणारे कलाकार वेळोवेळी भेट देत असतात. याठिकाणी ठेवलेले विविध शिल्प उत्कृष्ठ कलेचा नमुना आहे. येथील ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी संग्रहायलयातील व्यवस्थापक जातीने लक्ष देऊन काळजी घेत असतात. याठिकाणी राज्याच्या विविध भागांतील शालेय सहली येत असतात.
अशी आहेत दालने
स्वागत कक्ष : संग्रहालयाच्या प्रवेशद्वारासमोर श्रीमंत बाळासाहेब महाराज यांचे तैलचित्र लावलेले असून, चित्राच्या पाठीमागे संग्रहालयात कोणकोणते विभाग आहेत, याचा नकाशा लावलेला आहे.
छायाचित्र विभाग : स्वागत कक्षातून आत जाताच डावीकडे श्रीमंत बाळासाहेब महाराज यांच्या संबंधित दुर्मीळ फोटोंचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या घराण्याची वंशावळ, बाळासाहेब महाराज यांची जन्मकुंडली इतिहासप्रेमींना पाहावयास मिळते. याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर पत्र, श्रीमंत बाळासाहेब महाराजांचे वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांना लिहिलेले पत्र व इतर हस्ताक्षरांचे नमुने पाहावयास मिळतात.
४पंतप्रतिनिधी दालन : येथे पंतप्रतिनिधी घराण्याती व्यक्तींची पेंटिंग प्रदर्शित केली आहेत. तसेच औंध पंतप्रतिनिधी पद भूषविलेल्यांची माहिती दिलेली आहे.
४कोट्याळकर चित्रदालन : येथे बाळासाहेब महराजांच्या दरबारी असलेले चित्रकार विराप्पा कोट्याळकर या कलावंताचे पौराणिक चित्रांचे दालन आहे.