सातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण

By प्रगती पाटील | Published: February 17, 2024 02:22 PM2024-02-17T14:22:56+5:302024-02-17T14:23:33+5:30

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे  यासाठी पाचवीच्या ...

Preparation for scholarship exam in Satara district complete | सातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण

सातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे  यासाठी पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यात १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात पाचवीची १४० व आठवीची १०२ परीक्षा केंद्रे आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक २४ परीक्षा केंद्र फलटण मध्ये आहेत यात १ हजार ७७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सातारा तालुक्यातील २३ परीक्षा केंद्रातून तब्बल ३ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

आठवीच्या परीक्षेसाठी सातारा तालुक्यात २० परीक्षा केंद्रे आहेत. यात २ हजार ९५७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सर्वात कमी ३ परीक्षा केंद्र खंडाळा तालुक्यात असून यात ६२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हास्तरावरून व तालुकास्तरावरून परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत नियोजन झाल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Preparation for scholarship exam in Satara district complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.