शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

कंपनीच्या आवारात बिबट्याची ‘एंट्री’ : धावपळीत एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 7:37 PM

मलकापूर : कंपनीच्या आवारात बिबट्याला बघून सुरक्षारक्षकांची पळता भुई थोडी झाली. समोर बिबट्या दिसताच पळणारा सुरक्षारक्षक काही अंतरावर पडल्याने ...

ठळक मुद्देसुरक्षारक्षकांची पाचावर धारण ; भिंतीवरून उडी मारून बिबट्याची धूम

मलकापूर : कंपनीच्या आवारात बिबट्याला बघून सुरक्षारक्षकांची पळता भुई थोडी झाली. समोर बिबट्या दिसताच पळणारा सुरक्षारक्षक काही अंतरावर पडल्याने तो जखमी झाला. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे बिबट्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारत डोंगराच्या दिशेने पलायन केले. आगाशिवनगर येथील एका नामांकित कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आगाशिवनगर येथे कºहाड-ढेबेवाडी रस्त्यालगत एक नामांकित कंपनी आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कंपनीचा सुरक्षा रक्षक गस्त घालत होता. अचानक त्याला समोर बिबट्या दिसला. पथदिव्यांच्या उजेडात बिबट्या स्पष्ट दिसल्याने सुरक्षारक्षकाची घाबरगुंडी उडाली. तो जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पळत सुटला. काही अंतरावर तो पाय घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाला. आरडाओरडा ऐकून इतर सुरक्षारक्षकही एकत्र आले. त्यांनी तातडीने वनपाल रमेश जाधवर यांच्याशी संपर्क केला. कंपनीच्या आवारात बिबट्या बघितला असल्याचे त्यांनी सांगितले.

वनपाल जाधवर यांच्यासह कर्मचारी तातडीने कंपनीत दाखल झाले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांसोबत परिसरात शोधाशोध केली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. कंपनीत शोधाशोध सुरू होती त्याचवेळी दांगट वस्तीच्या बाजूने कुत्री भुंकत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दांगट वस्तीच्या बाजूला कमी उंचीच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने पुन्हा आगाशिव डोंगराच्या दिशेने धूम ठोकली असावी, असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. हा प्रकार समजताच आगाशिव डोंगराच्या पायथ्याला असलेल्या झोपडपट्टी परिसरात खळबळ उडाली आहे.

भरवस्तीत बिबट्याचा वावर झाला हे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. आगाशिव डोंगराच्या पायथ्याला मोठी वस्ती आहे. झोपडपट्टी परिसरात तर अनेक नागरिक बाहेरच झोपलेले असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.बिबट्याच्या भीतीने कंपनीला सुटीआगाशिवनगर येथील कंपनीच्या आवारात रात्रीच्यावेळी बिबट्या आल्याचे संबंधित कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पाहीले. कंपनीत सुमारे दीडशे कर्मचारी काम करतात. कंपनीच्या परिसरात असलेली झाडी व मोठ्या इमारती विचारात घेता बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये व खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी कंपनी बंद ठेवली असल्याची परिसरात चर्चा आहे.शनिवारीही दोन तास शोध मोहीमआगाशिवनगर परिसरातील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने बिबट्या पाहिला असल्याची खबर वनविभागाला दिली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत शोधूनही काही सापडले नाही. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा कंपनी प्रशासनाचा वनपाल जाधवर यांना फोन आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून दोन तास कंपनीचा परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या आढळला नाही, अशी माहिती वनपाल जाधवर यांनी दाली. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTigerवाघ