राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:09+5:302021-06-23T04:25:09+5:30
खंडाळा : खंडाळा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या ...

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे
खंडाळा : खंडाळा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढावी त्याचबरोबर गावोगावच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविता यावेत यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मजबूत करणे गरजेचे होते. नवीन अध्यक्ष निवडीनंतर तालुका कार्यकारिणी नियुक्त करण्यात येणार आहे. नियुक्तीपत्र प्रदान करताना राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, उद्योजक महेश राऊत, अजनुजचे माजी सरपंच मयूर भोसले, शिवाजीनगरचे माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, प्रतीक ढमाळ, प्रतीक मगर, प्रशांत भोसले, संकेत शिंदे, गौरव फाळके उपस्थित होते.
तालुक्यातील खासगी शालेय संस्थांनी अवाजवी आकारलेली फी त्याचबरोबर इतर शालेय समस्या याबाबत विद्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. विद्यार्थी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या छत्राखाली गावोगावी शाखा तयार करण्याचा मानस आहे, अशा भावना या वेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रवीण खंडागळे यांनी व्यक्त केल्या.