बिचुकले गावच्या सरपंचपदी प्रशांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:04+5:302021-02-25T04:53:04+5:30

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बिचुकले गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत ...

Prashant Pawar as Sarpanch of Bichukale village | बिचुकले गावच्या सरपंचपदी प्रशांत पवार

बिचुकले गावच्या सरपंचपदी प्रशांत पवार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बिचुकले गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत भीमराव पवार यांची, तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचेच युवा कार्यकर्ते सिद्धेश पवार यांची बिनविरोध निवड झाली.

बिचुकले गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सतीश संगापुरी यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी प्रशांत पवार यांचा तसेच उपसरपंचपदासाठी सिद्धेश पवार यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सरपंचपदी प्रशांत पवार यांची, तर उपसरपंचपदी सिद्धेश पवार यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या गावातील राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांना अपेक्षित यशही मिळाले होते. मात्र, भाजपच्या एका उत्साही कार्यकर्त्यामुळे दोन जागांसाठी निवडणूक लागली. यात दोन्ही जागा राष्ट्रवादीने घेतल्यामुळे भाजप उमेदवारांना अपयश स्वीकारावे लागले होते.

या निवडीबद्दल नवोदित सरपंच, उपसरपंच यांचे आमदार शशिकांत शिंदे, सुनील माने, तेजस शिंदे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, नीलेश जगदाळे, जयदीप पिसाळ, सोसायटी चेअरमन रमेश पवार, नारायण पवार, विजय पवार यांनी कौतुक केले.

Web Title: Prashant Pawar as Sarpanch of Bichukale village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.