मसूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रमोद गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:48+5:302021-07-16T04:26:48+5:30

मसूर : मसूर, ता. कराड येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी जय हुनमान करिअर अकॅडमी बेलवाडीचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांची तर ...

Pramod Gaikwad as the President of Masur Lions Club | मसूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रमोद गायकवाड

मसूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रमोद गायकवाड

मसूर : मसूर, ता. कराड येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी जय हुनमान करिअर अकॅडमी बेलवाडीचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांची तर सचिवपदी दिलीप पाटील व खजिनदारपदी रेखा लक्ष्मण राजमाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पदप्रदान अधिकारी म्हणून माजी प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांनी काम पाहिले, तर माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन शिवाजीराव फडतरे, झोन चेअरमन राकेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बेलवाडी, ता. कराड येथील जय हनुमान करिअर ॲकॅडमीच्या संकुलात झालेल्या मसूर लायन्स क्लबच्या बैठकीत सदरच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.

यावेळी नूतन अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी ‘क्लबने माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वी पार पाडण्याबरोबरच क्लबला महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर ठेवण्यासाठी सातत्याने कार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. माजी अध्यक्षा जान्हवी पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कराड लायन्स क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे, शांतकिरण चिकाळी, सुनील शिरटे, डॉ. इम्तियाज मुल्ला, रेखा लक्ष्मण राजमाने, मनीषा जयवंत जगदाळे, जितेंद्र निकम, दिलीप लंगडे, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, जयवंत जगदाळे, पुखराज ओसवाल, चंद्रकांत घोलप, राम धरणे, सदाशिव रामुगडे, दुष्यंतराव जगदाळे, डॉ. रमेश लोखंडे, उपस्थित होते.

फोटो :

बेलवाडी येथील कार्यक्रमात प्रमोद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड. एम. के. पाटील, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, रेखा राजमाने आदी उपस्थित होते.

Web Title: Pramod Gaikwad as the President of Masur Lions Club