शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:38 IST

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत

सातारा : सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून, यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे न बुजवल्यास संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुलांची, सेवा रस्त्यांची अपूर्ण कामे, मूलभूत सार्वजनिक सुविधांचा अभाव यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जीवितहानी होत आहे. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढू लागल्याने याची गंभीर दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या रिलायन्स व अन्य एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक लावली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत शंभूराज देसाई म्हणाले, आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावर पडलेले खड्डे नवीन हॉटमिक्स पद्धतीच्या तंत्रज्ञानाने भरावेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवले नाहीत तर संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही, यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.

कऱ्हाड-चिपळूण रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवातकऱ्हाड-चिपळूण रस्त्याचे काम दोन वर्षे रखडले होते. गेल्यावर्षी त्याची बैठक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसमवेत झाली होती. ते काम मंजूर झाले असून, ८० ते ८५ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. येत्या १५ दिवसांत हेही काम सुरू होईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने अथवा ठेकेदारांनी यात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईhighwayमहामार्ग