कोरेगाव तालुक्यात कारमधील प्रवाशाला पंधरा हजारांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 13:25 IST2017-09-05T13:15:50+5:302017-09-05T13:25:07+5:30

जोशीविहीर येथून पुण्याकडे जाण्यासाठी कारमध्ये प्रवाशी म्हणून घेतलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील गणेश दिलीप भोईटे (वय 27) या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटले.

In the possession of a car in Koregaon taluka, 15 thousand people were robbed |  कोरेगाव तालुक्यात कारमधील प्रवाशाला पंधरा हजारांना लुटले

कारमध्ये प्रवाशी म्हणून घेतलेल्या व्यक्तींकढून मारहाण

ठळक मुद्दे युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटलेकारमध्ये प्रवाशी म्हणून घेतलेल्या व्यक्तींकढून मारहाण एटीएमच्या दोन कार्डचे पिन नंबर काढून लुटमार कारमधील व्यक्तींकडे चाकू,पिस्तूल , लोखंडी राँड खंडाळा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुध्द विविध कलमांखाली तक्रार

शिरवळ (सातारा) : जोशीविहीर येथून पुण्याकडे जाण्यासाठी कारमध्ये प्रवाशी म्हणून घेतलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील गणेश दिलीप भोईटे (वय 27) या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटले.

कारमधील व्यक्तींनी मारहाण करत साडेपाच हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर मारहाण करून एटीएमच्या दोन कार्डचे पिन नंबर काढून घेतला. शिरवळ व खंडाळा येथे सात ते आठ चकरा मारून दोन्ही कार्डमधील दहा हजार रुपये काढले. गणेश भोईटे याच्या डोळयावर पट्टी बांधून खंडाळा घाटमार्गे वेळे , सोळशी फाटा येथे घाटमाथ्याला सोडले.


संबंधित कारमधील व्यक्तींकडे चाकू,पिस्तूल , लोखंडी राँड असल्याचे युवकाने लेखी खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. लुटमारप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुध्द आर्म अँकटनुसार व विविध कलमांखाली तक्रार दाखल झाली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत तपास करीत आहे.

Web Title: In the possession of a car in Koregaon taluka, 15 thousand people were robbed