मलकापूर : येथील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एजंटासह तिघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.एजंट सुरज बाळासाहेब सोनवणे (वय ४०, रा. आगाशिवनगर, ता. कराड), अमोल अनिल देसाई (३४, रा. नाचणे गोडावून थांबा, रत्नागिरी) व रामा आनंदा सकट (४६, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे शास्त्रीनगरमध्ये असलेल्या एका लॉजमध्ये काही महिलांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लॉजवर छापा टाकला. त्यावेळी चार पीडित महिला त्याठिकाणी आढळून आल्या.एजंट सुरज सोनवणे, रुमबॉय अमोल देसाई व रामा सकट हे तिघेजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत होते. संबंधित महिलांच्या गरिबीचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन ते हे कृत्य करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार तपास करीत आहेत.
Web Summary : Police raided a lodge in Malkapur, Satara, rescuing four women forced into prostitution. Three individuals, including an agent, have been arrested under anti-trafficking laws for exploiting the women for financial gain. Investigation is underway.
Web Summary : सतारा के मलकापुर में पुलिस ने एक लॉज पर छापा मारकर वेश्यावृत्ति के लिए मजबूर चार महिलाओं को छुड़ाया। एजेंट सहित तीन लोगों को महिलाओं का वित्तीय लाभ के लिए शोषण करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। जांच जारी है।