शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:52 IST

मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.

सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातारा पोलिसांनी आज, बुधवारी शहरातील सर्वच मशिदींसमोर खडा पहारा ठेवला. तर दुसरीकडे मनसेच्या  कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी वॉच ठेवला असून, साध्या वेशातील पोलीस शहरात गस्त घालत आहेत.

राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरात सर्वत्र मनसेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असले तरी साताऱ्यात मात्र, याउलट परिस्थिती आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काल, मंगळवारी सायंकाळी पोलिसांची परवानगी घेऊन राजवाडा परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, बुधवारी सकाळपासून पोलिसांनी शहरातील मशिदींसमोर बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. मशिदींसमोर शहरातील किती मंदिरे आहेत. याची यादीही पोलिसांनी तयार केलीय. या मंदिर परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांच्या मोबाइल लोकेशनवरही नजर

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या माेबाइल लोकेशनवर  लक्ष ठेवले आहे. सातारा शहरात ३६८ पोलीस आणि अधिकारी तैनात आहेत. याशिवाय जिल्ह्यातही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, जे सुटीवर गेले होते. त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMosqueमशिदPoliceपोलिस