वाईमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:12+5:302021-09-11T04:41:12+5:30
वाई : वाईमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस संचालन करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस ...

वाईमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचालन
वाई : वाईमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस संचालन करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या
मार्गदर्शनाखाली या वाई पोलिसांनी किसन वीर चौक ते मशिदी, रविवार पेठेतील चावडी चौक, परटाचा पार, जैन मंदिर, मार्गे भाजी मंडई आमंत्रण चौक मार्गे पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आले. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेश उत्सव साजरा करता आला नव्हता. यावर्षी काहीशी कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे वाई शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले.
गणेश उत्सव साजरा करताना ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे - खराडे यांनी केले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, शंकरराव गायकवाड आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातून संचलन केले.