पोलीस पाटलावर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST2021-07-07T04:49:26+5:302021-07-07T04:49:26+5:30

रमेश बाबूराव खबाले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अठरा वर्षीय युवती ...

Police molested Patla | पोलीस पाटलावर विनयभंगाचा गुन्हा

पोलीस पाटलावर विनयभंगाचा गुन्हा

रमेश बाबूराव खबाले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अठरा वर्षीय युवती २६ जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर आॅनलाइन असताना पोलीस पाटील रमेश खबाले हा आॅनलाइन असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने त्याला एवढ्या उशिरापर्यंत जागे का आहात, असा मेसेज केला. त्या वेळी पोलीस पाटील असलेल्या रमेश खबाले याने ‘तुझ्यामुळे’ असा रिप्लाय तिला दिला. त्या वेळी युवतीने मी काय केले, अशी विचारणा केली. त्यानंतर खबाले याने त्याच्या मोबाईलवरून युवतीला अश्लील व्हिडीओ पाठविला. युवतीने त्याबाबत जाब विचारला असता खबाले याने मोबाईल बंद केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने काही अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवले. युवतीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर कुटुंबीयांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश खबाले याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police molested Patla