शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलिस, कार्यकर्त्यांचे पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:32 IST

२८ जुलैला पोलिस ठाण्यावर मोर्चा

कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील निवासस्थानी चौकशीसाठी एक पोलिस गेले. मात्र, कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना, केवळ आमदार शिंदे यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे, असा दावा करीत संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षाचे कोरेगावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र साहिल शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, अरुण माने, ॲड. पी. सी. भोसले, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सातारा येथील पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी केली.कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी एका डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अक्षय सुरेश शिंदे हे कोणतीही परवानगी न घेता, बेकायदेशीरपणे शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हा संपूर्ण प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे साहिल शिंदे यांनी सांगितले.

२८ जुलैला पोलिस ठाण्यावर मोर्चाकोरेगाव पोलिसांकडून घडलेल्या प्रकाराबाबत आमदार शिंदे म्हणाले, पोलिस स्टेशन एखाद्या राजकीय पक्षाच्या इशाऱ्याप्रमाणे काम करत आहे. येत्या सोमवार (दि. २८) मी स्वतः कोरेगावात येणार आहे. पक्षाच्या वतीने कोरेगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.