कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

By Admin | Updated: August 24, 2014 22:40 IST2014-08-24T21:33:01+5:302014-08-24T22:40:26+5:30

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपे

Plate near the canal ... ... flat near the dam! | कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !
तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपे
परळी : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने उरमोडीच्या पाण्याने पेट घेतला आहे. प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधीचे आश्वासन उरमोडीचे पाणी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासर्व धुमशानीत उरमोडीच्या तांत्रिक बाबींकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. पाणी जोड कालव्यास सोडताना तांत्रिक कामे तशीच राहून गेली आहेत. त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळी तालुके अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी उरमोडी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र मूळ उद्देश बाजूला राहून उरमोडीच्या पाण्याने वेगळेच वळण घेतल्याने या पाण्यावरून श्रेयवाद झाले होेत. दोन वर्षांपूर्वी उरमोडी प्रकल्पातून कण्हेर जोड कालव्यात सोडण्यात आले. यावेळी जोड कालव्याचे बरेचसे काम बाकी होते.
मात्र, तेव्हापासून आजपर्यंत हा कॅनॉल मातीचाच राहिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅनॉलच्या प्रकल्पानजीक असलेल्या नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या गेटला आजतागायत वॉल, दरवाजा बसविण्यात आला नाही.
उरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. ४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग हे मातीचे कॅनॉल पाण्याचे प्रवाह रोखणार का? या कॅनॉलवर जागोजागी झुडपे उगवली आहेत. अजूनही कॅनॉलचे कामे अपूर्ण आहेत. माण तालुक्यात पाणी नेण्यासाठी कालवा नाही. माण-खटाव तालुक्यांला प्रत्येक ३.२८ अब्ज फुटांचे पाण्याचे वाटप झाले.
मात्र, सातारा तालुक्यातील कॅनॉलची कामे अजूनही कागदावरच प्रगतिपथावर आहेत. उरमोडी उपसा योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथून ४५० फूट पाणी उलचून नेणाऱ्या लाईट बिलाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. या लाईट बिलाच्या महिन्याचा खर्च ६० लाख आहे.
जिल्हा नियोजनामधून दुष्काळी स्थितीतच पाणी बिले करण्याची तरतूद आहे. मग इतर वेळी पाणी उचलून न्यायचे म्हटल्यास त्याचा बोजा उचलणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)

भिंतीलगत असणारा कॅनॉल मातीचा
उरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. या कॅनॉलवर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने पूर्ण केलेले काम आणि त्याला काँक्रीटचे अदा केले आहे. तरीही अजून कालव्याची कामे अपूर्णच आहे.

धरण प्रशासनाची दिवाळखोरी

उरमोडी जोड कालव्यापासून पाणी सोडण्यात आल्याने अडीच वर्षांत पहिल्यांदाच गेट बंद करण्यात आले आहे. मात्र, हे गेट सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणी सोडायचे झाल्यास त्या गेटचे काँक्रीट पुन्हा फोडायला लागणार आहे. प्रकल्पाच्या गेटला दरवाजा नसणे ही धरण प्रशासनाची दिवाळखोरीच समजली जात आहे.

Web Title: Plate near the canal ... ... flat near the dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.