शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST

फलटण : जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात चोवीस व्यक्तींच्या कोरोनाचाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. गेल्या ...

फलटण : जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात चोवीस व्यक्तींच्या कोरोनाचाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी चोवीस नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे प्रशासनातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

फलटण तालुक्यात मागील पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. दररोज सरासरी दहाच्या आसपास रुग्ण सापडायचे. राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असताना फलटण तालुक्यात रुग्ण संख्या खूपच कमी होती. नागरिकही निर्धास्त होते. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फलटण शहरात सोळा कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये फलटण शहर ११, बुधवार पेठ २, कसबा पेठ १, आनंदनगर १, लक्ष्मीनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, तर ग्रामीण भागात आठजण कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये वाठार निंबाळकर १, आंदरूड १, सुरवडी १, मिरगाव १, ढवळेवाडी १, पाडेगाव १, तरडगाव १, मलवडी १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहे. तालुक्यात हळूहळू रुग्ण संख्या वाढू लागल्याने नागरिकांनी आता सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.