फलटणला राजकीय वातावरण ढवळले

By Admin | Updated: February 10, 2015 00:25 IST2015-02-09T21:03:14+5:302015-02-10T00:25:49+5:30

निवडणुका : विविध संस्थांमध्ये वर्चस्वासाठी लढाई

Phaltan stirred up the political atmosphere | फलटणला राजकीय वातावरण ढवळले

फलटणला राजकीय वातावरण ढवळले

फलटण : फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकीचा बार उडणार असून, पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार आहे. निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.फलटण तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर गेले चार महिने वातावरण शांत होते; पण आता विविध निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होऊ लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या साठ हून अधिक विविध गावांच्या सोसायट्यांच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत. या सोसायट्यांच्या याद्या तयार करणे, प्रसिद्धी करणे हा कार्यक्रम सुरू आहेत. लहान, मोठ्या पतसंस्थांचेही कार्यक्रम जाहीर झालेला आहे. श्रीराम बझार या संस्थेची निवडणूकही लागली होती. मात्र प्रस्थापितांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीररीत्या करून घेण्याची विशेष खबरदारी घेत लोकांपुढे न येता निवडणूक कधी बिनविरोध करून घेतली, हे कळालेच नाही. असा प्रकार होऊ नये, यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी निवडणुका कधी आहेत, याची विचारणा करू लागले आहेत.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या मतदार याद्यांचे काम सुरू असून पुढील महिन्यात प्रत्यक्ष निवडणुकाच्या तारखा जाहीर होणार आहे. त्याचबरोबर श्रीमंत मालोजीराजे सह बँक़ फलटण, यशवंत को. आॅप. सह. बँक़ फलटण या मोठ्या बँकांचाही यादींचा कार्यक्रम लागलेला आहे.या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण. फलटण ता. सह. दूध पुरवठा संघ फलटण यांचाही कार्यक्रम जाहीर होणार आहे. हे वर्ष फलटण तालुक्यात निवडणुकांचेच राहणार आहे. (प्रतिनिधी)
नेतेमंडळींची खलबते
निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने विविध राजकीय नेतेमंडळींची खलबते सुरू झालेली आहेत. कार्यकर्त्यांचीही लगबग नेते मंडळींच्या घरी वाढून कार्यकर्तेही चार्ज होऊ लागले आहेत.

Web Title: Phaltan stirred up the political atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.