लोकसहभागतून सहा पोती धान्य अंधशाळेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 14:28 IST2017-08-12T14:27:40+5:302017-08-12T14:28:30+5:30
सातारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पिंपोडे (खुर्द) येथील ग्रामस्थ आणि शिवाजीराजे फाऊंडेशनच्या सहकार्यातून सहा पोती धान्य भाकरवाडी, ता. कोरेगाव, येथील अंधशाळेस देण्यात आले.

लोकसहभागतून सहा पोती धान्य अंधशाळेला
सातारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पिंपोडे (खुर्द) येथील ग्रामस्थ आणि शिवाजीराजे फाऊंडेशनच्या सहकार्यातून सहा पोती धान्य भाकरवाडी, ता. कोरेगाव, येथील अंधशाळेस देण्यात आले.
राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंध शाळेतील मुलींना औषध वाटप करण्यात आले. यासाठी मंदार राजमाने देऊर (महावितरण) अभियंता यांनी मदत केली.
राहुल कदम यांच्या प्रयत्नाने व जिल्हा परिषद तडवळ सह वाघोली शाळेतील विद्यार्थी यांच्या सहकार्याने दोन पोती गहू, ज्वारी आपुलकी मतिमंद शाळा, पाचवड, ता. वाई सातारा यांना देण्यात आली.
या निमित्ताने वरील दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी राहुल कदम यांच्या फाऊंंडेशनला धन्यवाद व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.